SIP मध्ये फक्त 1000/- दरमहा गुंतवून मिळावा 49 लाख, जाणून घ्या SIP म्हणजे काय ?

SIP (Systematic Investment Plan) – आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, जीवनामध्ये पैशाची नितांत आवश्यक असते. जीवनामध्ये आर्थिक नियोजन असेल तर येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जाणे शक्य होते. आर्थिक नियोजनासाठी कुटुंबाच्या मासिक आर्थिक उत्पन्नातून थोडी थोडी बचत करून गुंतवणूक केली पाहिजे. पद्धतशीरपणे गुंतवणूक करून तुम्ही तुमच्याजवळ मोठी रक्कम जमा करू शकता. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तर गुंतवणूक करणे अवघड असते कारण मध्यमवर्गीय कुटुंबाचे जेवढे उत्पन्न आहे, तेवढा खर्च होतो, त्यामुळे बचत होत नाही. परंतु भविष्याचा विचार केला तर, अचानक अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते यासाठी कुटुंबाच्या उत्पन्नातून थोडी थोडी बचत करणे आणि पद्धतशीरपणे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

SIP म्हणजे काय ?

एसआयपी म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान. म्हणजेच गुंतवणूक करण्याची पद्धतशीर प्रक्रिया, एसआयपी मध्ये तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवणूक करता या गुंतवणुकीवर 15 टक्के ते 18 टक्के इतके जास्त रिटर्न्स मिळतात. बँकांमध्ये 5 टक्के ते 6 टक्के एवढेच व्याजदर मिळते. परंतु एसआयपी मध्ये जास्तीत जास्त व्याजदर मिळून चांगले रिटर्न्स मिळतात. एसआयपी हे म्युच्युअल फंड प्रमाणेच एक गुंतवणुकीचा प्रकार आहे. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवता तर एस आय पी मध्ये तुम्ही दरमहा छोटी छोटी रक्कम किंवा एक ठराविक रक्कम गुंतवणूक करता. एस आय पी मध्ये गुंतवणुकीचे रक्कम वाढवत नेता येते.

SIP मधून करोडपती होन शक्य आहे का ?

SIP मध्ये 10 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष पद्धतशीरपणे गुंतवणूक केल्यास करोडपती होणे शक्य आहे. यासाठी रक्कम सुद्धा जास्त जास्त गुंतवत गेले पाहिजे. तर एसआयपी मधून करोडपती होणे शक्य आहे. परंतु एसआयपी मध्ये कमी कालावधीसाठी चांगले रिटर्न्स मिळत नाहीत.

दरमहा छोटे रक्कम गुंतवणूक करणे फायदेशीर

तुम्ही तुमच्या महिन्याच्या खर्चा मधून किमान पाचशे रुपये किंवा हजार रुपये नक्कीच बचत करू शकता ही रक्कम जर तुम्ही एसआयपी मध्ये गुंतवली तर तुम्हाला बँकेपेक्षा कितीतरी पटीने जास्त रिटर्न्स मिळणार आहेत. तुम्ही गुंतवलेले पैसे अनेक पटीने वाढवून तुम्हाला मिळणार आहेत. एसआयपी हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. त्यामुळे एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यास मोठी रक्कम मिळते.

हेही वाचा

HDFC BANK Kisan Gold Card – HDFC Bank कृषी पिक कर्ज