महाडीबीटीवर फक्त 23 रूपये फी भरून अनेक योजनांसाठी अर्ज करा.

महाडीबीटी योजना शेतकरी मित्रांनो, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध प्रकारचे योजना महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवल्या जातात. शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, फळबाग लागवड योजना अशा प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत.

महाडीबीटी फार्मर पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. शेतकरी मित्रांनो तुम्ही फक्त 23.60 रुपये एवढी फी भरून अनेक योजनांसाठी अर्ज करू शकता. महाडीबीटी पोर्टल वर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकरण उप अभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना अशा योजना राबवल्या जात आहेत.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

महाडीबीटी फार्मर पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.

1. आधार कार्ड

2. पॅन कार्ड

3. बँक पासबुक

4. शेतीचा सातबारा

5. शेतीचा खाते उतारा

शेतकऱ्यांना अर्ज करताना कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागत नाहीत. शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झाल्यानंतर मूळ कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात. कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची छाननी होते आणि शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम बँक खात्यामध्ये मिळते.

 

कृषी योजना साठी ऑनलाईन अर्ज करा

महाडीबीटी फार्मर पोर्टलची https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नवीन अर्जदार नोंदणी या पर्यायावर क्लिक करून यूजर आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्यावा लागेल. यानंतर आधार व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही तुमचे प्रोफाईल भरून घ्या. आणि तुम्हाला हव्या त्या घटकासाठी अर्ज करा. अर्ज करताना तुम्हाला फक्त 23.60 रुपये फी भरावी लागेल. तुम्ही एकावेळी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकता.