4000/- रुपये या दिवशी येणार बँक खात्यात, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी PM Kisan Yojana

PM Kisan Yojana – पी एम किसान योजना देशातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेमधून सरकार शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चासाठी वार्षिक सहा हजार रुपये देते. महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी ही योजना सुरू केली आहे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून वार्षिक 12000 रुपये मिळतात.

पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिनांक 28 फेब्रुवारी 2024 या दिवशी पाठवण्यात आला होता. आता शेतकरी सतराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार ?

शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जून महिन्यामध्ये मिळणार आहे. या सतराव्या हप्त्याची अधिकृत घोषणा सरकारने अजूनही केलेली नाही परंतु मीडिया रिपोर्टनुसार जून महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे. या हप्त्याच्या वेळी नमो शेतकरी योजनेचा ही हप्ता दिला जाऊ शकतो.

 

इ केवायसी करणे आवश्यक

शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला आधार इ केवायसी करणे आवश्यक आहे. तुम्ही जर या अगोदरही केवायसी केलेली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांची अजूनही केवायसी पूर्ण नाही त्या शेतकऱ्यांना ई केवायसी करणे आवश्यक आहे तरच त्यांना पुढील हप्ता मिळणार आहे.