एचडीएफसी बँकेचे किसान गोल्ड कार्ड, शेतकऱ्यांना मिळणार त्वरित कर्ज

HDFC Bank Kisan Gold Card / Credit Card : एचडीएफसी बँक शेतकऱ्यांसाठी अनेक कर्ज योजना राबवत असते. आता बँकेने शेतकऱ्यांसाठी “एचडीएफसी बँक किसान गोल्ड कार्ड” आणले आहे. केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड  यालाच किसान गोल्ड कार्ड असे म्हटले आहे. या योजनेतून प्रत्येक शेतकऱ्याला किसान गोल्ड कार्ड मिळेल. आणि शेतकऱ्यांना कृषी पीक कर्जासाठी सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.

किसान क्रेडिट कार्ड / एचडीएफसी बँक किसान गोल्ड कार्ड.

एचडीएफसी बँक किसान गोल्ड कार्ड या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी पीक कर्ज त्वरित मिळणार आहे. तसेच कृषी पीक कर्जासाठी सर्वाधिक रक्कम येणार आहे. शेतकऱ्यांना ऊस, केली, द्राक्षे, डाळिंब, मका, टोमॅटो, कांदा, ज्वारी / बाजरी अशा पिकांसाठी एचडीपीसी बँकेकडून कर्ज मिळत आहे. एचडीएफसी बँक नामांकित बँकांपैकी एक बँक आहे. त्यामुळे एचडीएफसी बँकेकडून पीक कर्ज घेणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांना माफक व्याजदरात पीक कर्ज मिळणार आहे.

शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र

आधार कार्ड

पॅन कार्ड

मतदान कार्ड

दोन फोटो

सातबारा व खाते उतारा

बचत खाते स्टेटमेंट

जमिनीचे मूल्यांकन

( वरील सर्वांची झेरॉक्स)

 

एचडीएफसी बँकेकडून किसान गोल्ड कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक आहेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या एचडीएफसी बँकेला भेट द्या.