ZP Kolhapur Bharti exam dates : नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्वच जिल्हा परिषद मध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील सर्वात मोठी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नाव आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये विविध विभागांमध्ये 728 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी अर्जाची छाननी पूर्ण झाली असून आता परीक्षेच्या तारखा देखील जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.
मित्रांनो संपूर्ण राज्यात दहा हजाराहून अधिक जागांसाठी 34 जिल्हा परिषदांमध्ये लाखो उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. या सर्व अर्जाची छाननी पूर्ण करून आता प्रत्यक्षात परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येत आहेत.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठी परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने या भरतीबाबतचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या कर्मचारी भरतीसाठी परीक्षेला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरूवात होणार आहे. आयबीपीएस कंपनीने सोमवारी याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 3 ऑक्टोंबरला 3 संवर्गाच्या परीक्षा होणार आहेत. यामध्ये कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी तसेच कनिष्ठ अभियंता विद्युत यांचा समावेश आहे तर 4 ऑक्टोबरला आरोग्य पर्यवेक्षक रिंगमन आणि फिटर या पदासाठीच्या परीक्षा होणार आहेत. 5 ऑक्टोबरला मेकॅनिक पदाची परीक्षा होणार आहे.
मित्रांनो जिल्हा परिषद भरती मध्ये एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये परीक्षा होणार आहेत असे जाहीर करण्यात आल्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आक्टोंबर च्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेची भरती परीक्षा सुरू होत आहे त्यामुळे इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये परीक्षा घेण्यात येतील हे निश्चित आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद भरतीसाठी अर्ज केलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच अभ्यासाला लागायला हवे.