Vidhwa Pension Yojana – नमस्कार, आज या पोस्टमध्ये आपण विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र या योजनेचे संपूर्ण माहिती घेणार आहोत. राज्यातील निराधार विधवा महिलांसाठी योजना राबवली जाते. या योजनेमध्ये महिलेच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा 900 रुपये आर्थिक मदत दिले जाते. देशातील जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या निकषानुसार विधवा पेन्शन योजना राबवली जात आहे.
विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र 2023
महाराष्ट्र मध्ये विधवा पेन्शन योजना राबवली जाते या योजनेमध्ये विधवा महिलांना दरमहा 900 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमध्ये विधवा महिला जर फक्त मुली असतील तर ही योजना कायम सुरू राहील. विधवा महिला जर मुलगा असेल तर तो पंचवीस वर्षाचा होईपर्यंत विधवा महिला योजनेचा लाभ घेता येते.
विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करावा
विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येतो. विधवा पेंशन योजनेचा अर्ज तहसीलदार कार्यालयामध्ये करावा लागतो. किंवा तुम्ही महा-ई-सेवा केंद्र यांच्याकडे अर्ज करू शकता. विधवा पेन्शन योजना सुरू करण्याअगोदर तुमच्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये जाऊन योजनेचे संपूर्ण माहिती घ्यावी. आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा.
राज्यातील सर्व निराधार विधवा महिलांना विधवा पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकतो
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 65 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 21 हजार रुपये असणे आवश्यक असते. असा तलाठी यांचा दाखला अर्ज करण्यासाठी घ्यावा लागतो
विधवा महिलेला फक्त मुली असतील तरीही योजना अशीच चालू राहते व मुलगा असेल तर मुलगा 25 वर्षाचा झाल्यानंतर ही योजना बंद होते.