Join WhatsApp Group

संजय गांधी निराधार पेन्शन योजना, आता मिळणार दरमहा 1500/- रुपये पेन्शन

Sanjay Gandhi niraadhaar anudan Yojana –  संजय गांधी निराधार पेन्शन योजना समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक साह्य देण्यासाठी शासनाने सुरू केली आहे. ही योजना समाजातील विधवा, दिव्यांग, अनाथ अशा निराधार लोकांसाठी आहे. या योजनेतून लाभार्थ्यांना दरमहा 1500/- रुपये मिळतात. समाजातील गरजू लोकांसाठी ही अतिशय उत्तम योजना आहे.

लाभार्थी

विधवा, दिव्यांग, दुरदर आजार ग्रस्त, अनाथ,  परित्यकता, देवदासी, अत्याचारीत महिला, वेश्याव्यवसायातून मुक्त झालेल्या महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंबप्रमुखाच्या पत्नीस, 35 वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री, इत्यादी दुर्बल निराधार घटकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

 

आवश्यक कागदपत्रे

विहित नमुन्यातील अर्ज

वयाचा दाखला – किमान 18 ते 65 वर्ष

किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी

विधवा महिला अर्जदारा करिता पतीचा मृत्यू दाखला

दिव्यांग जिल्हा शल्यचीक्षकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक ( किमान 40%)

कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21000/- रुपये.

आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी दाखला, अर्जदाराचे फोटो इत्यादी.

अर्ज कोठे करावा

तहसील कार्यालय, सेतू केंद्र

 

 

 

 

 

 

 

1 thought on “संजय गांधी निराधार पेन्शन योजना, आता मिळणार दरमहा 1500/- रुपये पेन्शन”

  1. 10 month hot ahe
    Ajun sudha Paisa ch kahi pata nahi ahe
    Ani tumi mnt ahe paisa madhe wad zali
    Pahile old wale tr dya.

    Reply

Leave a comment