कृषी यांत्रिकीकरण उप अभियान
शेतकऱ्यांना ट्रॅक्टर पॉवर टिलर यासारखी कृषी यंत्रे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजनेअंतर्गत मिळतात. कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण दोन किलो वॅट हेक्टरपर्यंत वाढवणे. हा उद्देश आहे.
अर्ज करण्यासाठी पात्रता
शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
शेतकऱ्याकडे सातबारा उतारा व आठ अ असावा
शेतकरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यामधील असल्यास जातीचा दाखला असणे आवश्यक असते
फक्त एकाच अवजारासाठी अनुदान देय राहणार आहे म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र अवजार
कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असते
एखाद्या घटकासाठी अवजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक अवजारासाठी पुढील दहा वर्षे अर्ज करता येत नाही परंतु इतर अवजारासाठी अर्ज करता येतो
अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात
आधार कार्ड,
सातबारा उतारा,
8अ दाखला,
खरेदी करावयाच्या अवजाराची कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
स्वयंघोषणापत्र
पूर्वसंमती पत्र
मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला
अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली देण्यात आले आहे
👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.