पीएम किसान योजना नवीन नाव नोंदणी
नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दरवर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून सहा हजार रुपये मिळतात. तसेच या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आता महाराष्ट्र सरकारचे सहा हजार रुपये अजून मिळणार आहेत असे एकूण वर्षाला शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेस पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेचे अनुदान मिळतेच परंतु नवीन शेतकऱ्यांना किंवा या योजनेमध्ये नाव नसणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेचा अर्ज कसा करावा याची माहिती आज आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत.
Pm Kisan Yojana new registration information in Marathi
शेतकऱ्यांनी योजनेचा अर्ज करण्यासाठी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला pmkisan.gov.in वर भेट द्या. या वेबसाईटवर आल्यानंतर समोर new farmer registration हा पर्याय समोर दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकता.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड ( आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक)
2. रेशन कार्ड ( रेशन कार्डचा बारा अंकी नंबर माहीत असणे आवश्यक असते)
3. जमिनीचा सातबारा व खाते उतारा (अर्ज करताना शेतीचा लँड रजिस्ट्रेशन आयडी विचारला जातो या ठिकाणी सातबारा वरील UAN नंबर टाकावेत. तसेच इतर संपूर्ण माहिती भरून अर्ज करवा.)
4. बँक पासबुक
पीएम किसान योजना नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा
हेही वाचा