Join WhatsApp Group

पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार एकरी 18900 रुपये, यासाठी असा करा क्लेम

प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र – फक्त एक रुपया मध्ये पिक विमा

नमस्कार मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना फक्त एक रुपया मध्ये पिक विमा भरण्यासाठी सुविधा सुरू केले आहे. या अगोदर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा साठी एकरी दोनशे रुपये ते एक हजार रुपयापर्यंत स्वहिस्सा भरावा लागत होता. आणि यानंतरच पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत होता. परंतु यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पिक विमा योजना सुरू केले आहे.

यावर्षी महाराष्ट्र मध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता उद्भवली आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेण्यासाठी आता पावसाची अत्यंत आवश्यकता आहे परंतु राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पाऊस पडणे बंद झाले आहे. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास शेती पिकांचे नुकसान होणारच आहे असे दिसून येत आहे. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमुळे तुमच्या शेतीमधील पिकाचे नुकसान होत असल्यास आणि तुम्ही पिक विमा उतरवला असल्यास नुकसान भरपाई साठी क्लेम करू शकता. नुकसान भरपाई क्लीन करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकता.

नुकसान भरपाई क्लेम करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळते. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीचा पिक विमा उतरवला पाहिजे तसेच शेतीमध्ये नुकसान झाल्यास लगेच नुकसान भरपाई साठी क्लेम करणे आवश्यक आहे.

Leave a comment

%d bloggers like this: