पिक विमा नुकसान भरपाई क्लेम कसा करावा? | Pik Vima Claim
नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने यावर्षी सर्व शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपया मध्ये पिक विमा ही योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी एक रुपया भरून शेतीचा पिक विमा उतरला आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीमध्ये नैसर्गिक कारणामुळे झालेल्या नुकसानीसाठी नुकसान भरपाई रक्कम दिली जाते. शेतकऱ्यांनी शेतामध्ये नुकसान झाल्यानंतर 96 तासांच्या आत नुकसान भरपाई मिळण्यासाठी क्लेम करावा लागतो. या पोस्टमध्ये आपण नुकसान भरपाई साठी क्लेम कसा करावा याची माहिती घेणार आहोत.
नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक विमा क्लेम करण्याची ऑनलाईन पद्धत
प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांनी एक रुपया भरून शेतीचा पिक विमा उतरला आहे. या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्यांना या योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यासाठी शेतीमध्ये नुकसान झाल्यानंतर 96 तासाच्या आत नुकसान भरपाई साठी क्लेम करता येतो. नुकसान भरपाई साठी क्लेम करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे तुम्ही तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये किंवा कृषी सहाय्यक यांच्याकडे नुकसान भरपाईसाठी दावा करू शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही नुकसान भरपाईसाठी दावा करू शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून crop insurance या नावाचे एप्लीकेशन डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाई क्लेम करू शकता.
crop insurance एप्लीकेशन डाऊनलोड करा
पिक विमा नुकसान भरपाई क्लेम
हेही वाचा
बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी ? असा करा अर्ज
पी एम किसान योजना नवीन नोंदणी, वार्षिक 12 हजार रुपये, असा करा ऑनलाईन अर्ज