नमस्कार मित्रांनो, एचडीएफसी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी मुद्रा कर्ज योजना राबवली जात आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना गाई म्हैस खरेदीसाठी विनातारण कर्ज दिले जाणार आहे. तसेच या कर्ज योजनेला अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज व्याज सवलतही मिळणार आहे.
HDFC बँक पशुपालन मुद्रा लोन योजना
एचडीएफसी बँकेमार्फत सर्व शेतकऱ्यांसाठी पशुपालन मुद्रा लोन योजना राबवली जात आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना एचडीएफसी बँक मार्फत दहा लाख रुपये पर्यंत विनातारण कर्ज दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांकडून काहीही कारण घेतले जात नाही. या योजनेमध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून व्याज सवलतही शेतकऱ्यांना घेता येत आहे. शेतकऱ्यांचा पशुपालन व्यवसाय वाढवण्यासाठी ही अतिशय उत्तम योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत.
आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. पॅन कार्ड
3. पासपोर्ट फोटो
4. बचत खात्याचे एक वर्षाचे स्टेटमेंट
5. डेअरीचे स्टेटमेंट
6. डेअरी पावत्या
7. लाईट बिल
8. शेतीचा सातबारा व आठ अ
9. कर्ज असल्यास त्याचे 1 ते 2 वर्षाचे स्टेटमेंट
मित्रांनो अधिक माहितीसाठी एचडीएफसी बँकेच्या जवळच्या शाखेमध्ये अवश्य भेट द्या.