नमो शेतकरी महासन्मान निधी योजना |
Farmer schemes – शेतकरी मित्रांनो देशामध्ये प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. या योजनेप्रमाणेच आता महाराष्ट्र सरकारने ही शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. नमो शेतकरी योजनेमधून पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी शेतकऱ्यांची नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसणार आहे. मागील काही दिवसात पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळेल याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे.
नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार ?
पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्या बरोबरच नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार होता परंतु महाराष्ट्रातील अजून बारा लाख शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत, यामुळे महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांची आधार केवायसी तसेच जमिनीचे रेकॉर्ड अद्यावत करण्याचे अभियान सुरू केले होते. या शेतकऱ्यांच्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देता यावा यासाठी या योजनेस विलंब होत आहे. तरी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता पुढील एक महिन्यांमध्ये जमा होईल अशी माहिती देण्यात येत आहे.
पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी येथे करा
नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारची नवी आणि महत्त्वकांशी योजना आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेप्रमाणेच सहा हजार रुपये मिळणार आहेत. पी एम किसान योजनेमध्ये नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे जे शेतकरी पात्र असूनही अजून पीएम किसन योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांच्यासाठी आता नवीन नोंदणी ही सुरू झाली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
बांधकाम कामगारांची नोंदणी येथे क्लिक करून करा