सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता दसऱ्यापूर्वी जमा होण्याची शक्यता आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना शेतीचा विकास करण्यासाठी सरकार नमो शेतकरी योजनेतून आर्थिक सहाय्य देत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना 2000 प्रति हप्ता प्रमाणे तीन हप्त्यात ऐकून 6000 दिले जाणार आहेत. नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना राज्य सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे आता राज्य सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देणार आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता कोणाला मिळणार आहे
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ जे शेतकरी अगोदर पासूनच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर प्रधानमंत्री किसान सन्माननीधी योजनेअंतर्गत जर नोंद असेल आणि तुम्हाला जर दरवर्षी सहा हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेचे ६ हजार मिळून आता एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत.
योजनेचा लाभ मिळेल की नाही हे कसे समजेल ?
नमो शेतकरी योजनेचा लाभ जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा लाभ घेत आहेत त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमचा बेनिफिशरी स्टेटस पाहू शकता.
बेनिफिशर स्टेटस पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पहा
अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला माझी योजना या वेबसाईटवर मिळेल.