Join WhatsApp Group

Indian post schemes पोस्टाच्या या योजनेत पैसे होतात दुप्पट, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Post Vibhag Schemes

 

पोस्ट विभागामार्फत गुंतवणुकीच्या अनेक चांगल्या योजना राबवल्या जात आहे. पोस्टमध्ये केलेली गुंतवणूक ही इतर गुंतवणुकीपेक्षा अतिशय सुरक्षित गुंतवणूक असते. पोस्ट विभाग केंद्र सरकारच्या असल्याने त्याला सरकारी सुरक्षितता असते. पोस्टाची एक योजना आहे त्यामध्ये ठराविक मुदतीनंतर तुमची रक्कम दाम दुप्पट होते. या योजनेचे नाव आहे किसान विकास पत्र.

किसान विकास पत्र योजना

किसान विकास पत्र योजना ही भारतीय पोस्ट विभागामार्फत चालवली जाते. या योजनेमध्ये कमीत कमी हजार रुपये गुंतवता येतात. जास्तीचा रकमेची काही मर्यादा नाही. किसान विकास पत्र योजनेचे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येते. मित्रांनो किसान विकास पत्र या योजनेमध्ये गुंतवणूकदाराला 7.5% दराने वार्षिक व्याजदर मिळते. या योजनेचा कालावधी 115 महिने आहे. या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये गुंतवू शकता, जास्तीच्या रकमेची मर्यादा नाही. या योजनेतून मिळणाऱ्या व्याजावर सरकार कर आकारत नाही. त्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळून जास्त रक्कम मिळते.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, किसान विकास पत्र योजनेचा अर्ज, रहिवासी दाखला, जन्म प्रमाणपत्र.

 

अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस ला भेट द्या.

Leave a comment

%d bloggers like this: