HDFC Bank Loan
HDFC Bank Loans For Farmers पशुपालन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आता तुम्ही एचडीएफसी बँकेकडून गाई किंवा म्हैस खरेदीसाठी दहा लाख रुपये पर्यंत विनातारण कर्ज घेऊ शकता. एचडीएफसी बँक ही देशातील अग्रगण्य अशी बँक आहे. शेतकऱ्यांसाठी बँकेने विविध योजना आणल्या आहेत. एचडीएफसी बँकेने शेतकऱ्यांना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी कर्ज देण्याची अतिशय चांगली योजना आणली आहे या योजनेमध्ये शेतकरी दहा लाख रुपयांची कर्ज विनातारण मिळू शकत आहेत.
खालील प्रमाणे आवश्यक अटी आहेत
1. शेतकऱ्याला दुग्ध व्यवसायाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2. मागील एका वर्षापासूनचे रोजचे 50 लिटर दूध डेरी मध्ये घातलेले असावे.
3. मागील एक वर्षाचे पेमेंट डेअरी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलेल्या असावी.
4. एक गाय घेण्यासाठी साठ हजार रुपये याप्रमाणे दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.