Mahatma Gandhi Rojgar Hami Yojana Maharashtra
नमस्कार मित्रांनो, आपल्या गावामध्ये कोणत्या शासकीय योजना आल्या आणि गेल्या हे अनेक लोकांना माहीतच नसते त्यामुळे त्यांना अशा अनेक योजनांचा लाभ घेता येत नाही. मित्रांनो रोजगार हमी योजनेतून गावाच्या समृद्धीसाठी सार्वजनिक लाभाची कामे आणि लक्षदिश होण्यासाठी वैयक्तिक लाभाची कामे या योजना ग्रामपंचायत च्या माध्यमातून राबवल्या जातात. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक लाभाची कामे यामध्ये पुढील योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.
सिंचन विहीर
नाडेप कंपोस्टिंग
रोपवाटिका
शौचालय
गोठा
कुकुट पालन शेड
वृक्ष लागवड
फळबाग लागवड
शेततळे
घरकुल
वरील प्रकारे अशा बऱ्याच योजना राबवल्या जातात.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो वरील योजना साठी ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे नोंदणी करायची असते. नोंदणी केल्यानंतर जॉब कार्ड मिळते. जॉब कार्ड मंजूर कुटुंबाकडे ठेवायचे असते. या जॉब कार्ड मुळे केलेल्या कामाची किती मजुरी मिळाली ते कळते. मित्रांनो जॉब कार्ड काढण्यासाठी काहीही खर्च येत नाही. मित्रांनो प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सरपंच सदस्य ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी महिन्यातून दोनदा रोजगार दिवस भरवायचा असतो.