नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र या योजनांमध्ये दोन प्रकारची कामे असतात. गावाच्या समृद्धीसाठी सार्वजनिक लाभाची कामे आणि लक्षाधीश होण्यासाठी वैयक्तिक लाभाची कामे या योजनांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर जॉब कार्ड मिळते. जॉब कार्ड काढण्यासाठी नागरिकांना कोणताही खर्च येत नाही. जॉब कार्ड मुळे केलेल्या कामाची किती मजुरी मिळाली हे समजते.
कामाची मागणी ग्रामसेवक किंवा ग्राम रोजगार सेवक यांच्याकडे करायची व कामाच्या मागणीची पोहोच द्यायची.
काम मागणी केल्यावर पंधरा दिवसात गावातच काम सुरू होणार आहे.
या कामांची मजुरी तुमच्या बँक किंवा पोस्टाच्या खात्यावर जमा होते.
गावातील योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायत मधील ग्रामसेवकाशी संपर्क साधा.