नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी होते, आता नमो शेतकरी महासंमा निधी योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहावा हप्ता मिळण्यासाठी, शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे यामध्ये या योजनेसाठी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता स्पष्ट झाले आहे की शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे.
नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे सहा हजार रुपये दिले जातात या योजनेअतर्गत आत्तापर्यंत पाच हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता या योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. पी एम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पुढील काही दिवसांमध्येच येणार आहे.
👇👇👇
नमो शेतकरी योजनेचा शासन निर्णय पहा.