शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या जातात. यामध्ये कृषी तारण कर्ज योजना ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात ठेवू शकता. आणि त्या उत्पादनाच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकतात. मार्केटमध्ये उत्पादनांचे दर वाढले की तुम्ही तुमचे उत्पादन बाजारात विकू शकता आणि कर्जाची परतफेड करू शकता. तुमच्या उत्पादनाला जास्त चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची आहे.
शेतमाल तारण कर्ज योजना
शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना असणाऱ्या आर्थिक गरजेसाठी स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतीमालाचे काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतीमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. त्यामुळे शेतमालाचे बाजार भाव कमी होतात. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. सदर शेतमाल साठवणूक करून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजारभाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य भाव मिळावा. या दृष्टिकोनातून शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज देण्यात येते.
👇👇👇