महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र शासन - 35% किंवा 10 लाख रुपये अनुदान

.


        महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान - केंद्र शासन सहाय्यीत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)


स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

 मोठे प्रकल्प व सहकारी संस्था, शेतकरी कंपनीसाठी अनुदान 

वरील व्यक्तिगत छोट्या प्रकल्प बरोबरच

याच योजनेअंतर्गत सामूहिक सुविधा केंद्र व मार्केटिंग व ब्रँडिंग या घटकांतर्गत मोठे प्रकल्प सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांचा फेडरेशन संघ यांच्यासाठी 35 ते 50 % व जास्तीत जास्त 3  कोटी रुपये पर्यंत अनुदान देय आहे.


योजनेचे नाव : प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PM FME)

पात्र लाभार्थी : शेतकरी, युवक, उद्योजक, महिला, चालू उद्योग, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था.

दुग्ध संस्था ,अटल व नाविन्यपूर्ण सहकारी संस्था.

 

🏗️योजने अंतर्गत समाविष्ट प्रक्रिया उद्योग

या योजनेमध्ये खाद्यपदार्थांशी  निगडित कोणताही  अन्न प्रक्रिया उद्योगाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया होऊन खाद्यपदार्थ पॅक बंद विक्रीस उपलब्ध केला पाहिजे.


उदाहरणार्थ काही उद्योगांची यादी


 उसाचे गुराळ अर्थात गुळ उद्योग, गुळ पावडर तयार करणे, रसवंती गृह (पॅक बंद ऊस रस देणे), चक्की तयार करणे 

 शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू,

१. दूध प्रक्रिया : 

खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.


२. मसाले प्रक्रिया : 

चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.


३. चटणी प्रक्रिया :

 शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.


४. तेलघाणा प्रक्रिया :

 शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.


५. पावडर उत्पादन प्रक्रिया:

 काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ.


६. पशुखाद्य निर्मिती: 

मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.


७. कडधान्य प्रक्रिया : 

हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.


८. राईस मिल: 

चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.


९. बेकरी उत्पादन प्रक्रिया : 

बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ. 

10. काजू प्रक्रिया युनिट

तसेच इतर खालील प्रमाणे

सागरी उत्पादने - मत्स्य मासे लोणचे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश Popcorn, नगेट्स, टिक्की, समोसा, पकोडा,  इत्यादी.

 🧇 नाचणी - पीठ, पापड, बिस्कीटे,  कुकीस, नाचणी सत्व,चकली, इडली, शंकरपाळी,इत्यादी.

 🫓 भगर- पीठ,भगर,इत्यादी.

🥚 चिकू-स्कॅश, पल्प, जाम, जेली, नेक्टर, स्लाईसेस, आईसक्रिम, कॅंडी, पावडर, ज्यूस,चॉकलेट,चॉकलेटबार

फ्रुटबार,वडी, ड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्स, इत्यादी.

🥭 आंबा-पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्कॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड  स्लाईसेस, डबाबंद, ज्यूस, गोठवलेले, लोणचे, चटणी,फ्रुटबार, लश, सॉस, कुंदा,सॉफ्टकँडी,अल्कोहल विरहित पेय,इत्यादी.

🍌 केळी- चिप्स, प्यूरी, पल्प, वाईन, पावडर, वेफर्स, Concentrate, Figs,  Flour,  फ्रोझन स्लायसेस व डायसेस, जाम,फ्रुटी,बार, सुकेली टॉफी, ड्रायफ्रूट पिल कँडी,इत्यादी. 

🧅 कांदा -फ्राईड कांदा,  Dehydrated Onion Flakes, पेस्ट, पावडर, Strips , ऑईल, सॉस, लोणचे इत्यादी.

🍅 टोमॅटो -केचअप, जाम, प्यूरी, सॉस, कॅन  टोमॅटो, पेस्ट, टोमॅटो चटणी, RTE ,सूप,ज्यूस, लोणचे,इत्यादी.

🥛🍦 दुग्ध व दुग्धजन्य -बासुंदी, पनीर,लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा,मावा,छन्ना, संदेश,पेढा, कलाकंद,कुल्फी, रबडी,बर्फी, चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई, रसगुल्ला,इत्यादी.

🌽 ज्वारी - Flakes, पिठ, पापड, माल्ट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.

🌾 गहू- Flakes, पिठ, ब्रेड, माल्ट, बिस्कीट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.

🎋 गुळ- गुळ पावडर,  ज्यूस, यीस्ट, मॉलॅसेस, काकवी, इत्यादी.

🍇 द्राक्षे- बेदाणा, वाईन, ज्यूस, विनेगार, Sweet spreads, मनुका, वाईन स्वॅश, लोणचे,इत्यादी.

🌽 मका-कॉर्न सिरप, पीठ,  Flakes, ऑईल,  स्टार्च,‍ Corn Stalk Fiddle, सॉस, पॉपकॉर्न  इत्यादी.

🍊 मोसंबी-ज्यूस,पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर,  सायट्रीक ॲसीड, Concentrate, Marmalade, ड्रायफ्रूट,इत्यादी.

🍈 सिताफळ- पल्प, जाम, जेली, पावडर, सीड ऑईल, आईसक्रिम, रबडी, बर्फी, ड्राइड स्नॅक्स, ज्यूस, कँडी,इत्यादी. 

🍐 पेरू- ज्यूस, जाम, जेली, पल्प, नेक्टर, टॉफी,  RTS पेय, वाईन, प्यूरी,चॉकलेट, चीज, फ्रुटबार, टॉफीज,इत्यादी.

🥗 हरभरा-बेसन पीठ, नमकीन, फूटाणे, डाळ इत्यादी.

🌿 तुर - डाळ,पीठ,इत्यादी.

🌾 मुग- पापड, डाळ, पीठ  इत्यादी.

🥫 हळद-पावडर, ड्राईड रायझोम,  इत्यादी.

🌶️ मिरची-पावडर, ड्राईड मिरची,Flakes, लोणचे,डीहायड्रेशन,इत्यादी.

🍊 संत्रा- ज्यूस,पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर,  सायट्रीक ॲसीड, Mandarin Concentrate,, Marmalade  तेल - mandarin essential oil, Clementine Oil , इत्यादी.

🥜 सोयाबिन- तेल, टोफू, सोयामिल्क, सोयानट, सोयाचन्क, सोया प्रोटिन, सोया सॉस, सोया  स्टिक, सोया चिप्स,  पीठ, इत्यादी.

🥠 जवस-चटणी,  तेल, इत्यादी.

🍚 भात- पोहा, मुरमूरे, पीठ, पापड, ऑईल, Parboiled Rice, Flakes, बिअर, इत्यादी.

🌲🎄 किरकोळ वन उत्पादने -हिरडा पावडर,  महुवा-  तेल/पावडर/केक /बिस्कीट/ कुकीस/लोणचे/ इत्यादी. मशरुम- सुकवलेले मशरुम/बिस्कीट/कुकीस,मध, डिंक,इत्यादी.


वरील उद्योगाची यादी ही प्राथमिक असून या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसाह्य अनुदान मिळू शकते .

Post a Comment

Previous Post Next Post