PM Kisan Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता पुढील महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पुढील फेब्रुवारी महिन्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता मिळण्यासाठी आता शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. तरच त्यांना पी एम किसान योजनेचा पुढील 19 वा हप्ता मिळणार आहे. शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढून घ्यावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढल्यानंतरच पी एम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आयडी काढून घ्यावा.
👇👇👇
फार्मर आयडी काढण्यासाठी येथे क्लिक करा.
नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने शेतकऱ्यांसाठी ॲग्रीस्टॅक फार्मर रजिस्ट्रेशन ही योजना सुरू केली आहे. ॲग्री स्टॅग या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना युनिक फार्मर आयडी मिळणार आहे. या युनिक फार्मर आयडीचा शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोग होणार आहे. फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील सीएससी केंद्राला भेट देऊ शकता.
फार्मर आयडी अधिकृत वेबसाईट https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/
👇👇👇
फार्मर आयडी काढण्याचे फायदे जाणून घ्या
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता या तारखेला जमा होणार
पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वीचा अठरावा हप्त शेतकऱ्यांना ऑक्टोंबर महिन्यामध्ये देण्यात आला होता. या योजनेमध्ये प्रत्येक चार महिन्यानंतर दोन हजार रुपये चा हप्ता दिला जातो. फेब्रुवारी महिन्यामध्ये आता हप्ता वितरित करण्यात येईल अशी चर्चा सर्व मीडियामध्ये करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या 24 तारखेला योजनेचा हप्ता जमा होईल असे सांगण्यात येत आहे.