नमस्कार मित्रांनो, दिव्यांग लोकांना महाराष्ट्र शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्या वतीने जास्तीत जास्त तीन लाख 75 हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. दिव्यांका लोकांना हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही रिक्षा अर्थात फिरत्या वाहनावरील दुकान यासाठी जास्तीत जास्त तीन लाख 75 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत.
👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
रिक्षा अनुदान योजनेसाठी अर्ज कोण करू शकते
या योजनेसाठी राज्यातील फक्त दिव्यांग लोक या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात ज्या व्यक्ती 40% पेक्षा जास्त अपंग आहेत अशा व्यक्ती या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात. दिनांक 22 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025 असा ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे. या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
आवश्यक पात्रता
1. अर्जदाराकडे 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे (UDID प्रमाणपत्र)
2. अर्जदाराची वय 18 ते 55 वर्षे असावे.
3. वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराचा फोटो
अर्जदाराची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करणे
जातीचा दाखला
अधिवास प्रमाणपत्र
रेशन कार्ड
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (UDID सर्टिफिकेट)
आधार कार्ड
बँक पासबुक
अर्ज कसा करावा माहितीचा व्हिडिओ पहा.