बांधकाम कामगार योजना बांधकाम कामगारांना 35 पेक्षा जास्त योजनांचा लाभ मिळतो. या योजनांची सविस्तर माहिती तुम्हाला बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.
Bandhkam Kamgar Nondani Suru
सर्व बांधकाम क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या कामगारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. बांधकाम कामगार नोंदणी सुरू झाली आहे. बांधकाम कामगारांना 35 योजनांचा लाभ मिळणार आहे. देशामध्ये जास्तीत जास्त रोजगार हा बांधकाम क्षेत्राशी संबंधित आहे. गवंडी, बांधकाम मजूर, सेंट्रींग वाले, फरशी कामगार, खिडक्यांना स्लाइडिंग बसवणारे कामगार, पेंटर, सुतार काम, वेल्डर, लाईट फिटिंग कामगार, अशाप्रकारे सर्व प्रकारचे कामगार जे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष या बांधकाम संबंधित काम करत आहेत. त्यांना बांधकाम कामगार असे म्हटले जाते. बांधकाम कामगारांना शासनामार्फत अनेक कल्याणकारी योजना दिल्या जात आहेत.
कल्याणकारी योजना
1. सामाजिक सुरक्षा
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रुपये तीस हजार अनुदान.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना
- प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
- पूर्व शिक्षण प्रशिक्षण योजना
2. शैक्षणिक
- इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष अडीच हजार रुपये अनुदान
- इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी पाच हजार रुपये अनुदान
- इयत्ता दहावी व बारावी मध्ये किमान 50% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये अनुदान
- इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्ष रुपये दहा हजार रुपये अनुदान
- पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी वीस हजार रुपये अनुदान
- वैद्यकीय पदवीकरता प्रतिवर्षी एक लाख रुपये अनुदान
- अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्षी साठ हजार रुपये अनुदान
- शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20 हजार रुपये अनुदान
- शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी रुपये 25 हजार रुपये अनुदान
- नदीत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना एमएस-सीआयटी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
3. आरोग्य विषयक योजना
- नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये अनुदान
- गंभीर आजारांच्या उपचारासाठी एक लाख रुपये अनुदान
- या योजनेमध्ये लाभार्थी कामगार त्याच्या सर्व कुटुंबीयांना लाभ मिळतो.
- एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाख रुपये मुदत ठेव
- अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये अनुदान
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
- आरोग्य तपासणी करणे
4. आर्थिक योजना
- कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास पाच लाख रुपये अनुदान
- कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अनुदान कायदेशीर वारसास
- अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसाह्य दोन लाख रुपये
- अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण अर्थसहाय्य दोन लाख रुपये