विमा सखी योजना
विमा सखी योजना ही योजना केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केले आहे. या योजनेची सुरुवात माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकार महिलांसाठी अनेक योजना सुरू करत आहे. आता केंद्र सरकारने महिलांसाठी विमा सखी ही योजना आणली आहे या योजनेमध्ये महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी या भारत सरकारच्या विमा कंपनीकडून विमा सखी योजना राबवली जाणार आहे. या योजनेची सुरुवात हरियाणा मध्ये करण्यात आली आहे. ही योजना संपूर्ण देशामध्ये राबवली जाणार आहे.
या योजनेमध्ये महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये महिलांना पगारही दिला जाणार आहे तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. तसेच पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांना एलआयसी कंपनीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधीही मिळणार आहे.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
महिला दहावी उत्तीर्ण असावी
महिलेचे वय 18 ते 70 वर्षे या दरम्यान असावे
एलआयसी ची विमा सखी ही योजना महिलांना प्रशिक्षण देणारी योजना आहे या योजनेमध्ये त्यांना दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे. या योजनेमध्ये तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये शिष्यवृत्ती, दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये, आणि तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड,
वयाचा पुरावा,
पत्त्याचा पुरावा
दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
अर्ज कसा करावा ?
विमा सखी योजनेचे अर्ज एलआयसी च्या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहेत. योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
👇👇👇