संजय गांधी निराधार पेन्शन योजना या महिलांना दरमहा २१००/- रुपये पेन्शन

 


राज्यातील निराधार आणि दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार पेन्शन योजने अंतर्गत दरमहा 1500 रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेसाठी कोण पत्र आहेत ? योजनेसाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याची माहिती या पोस्त मध्ये घेणार आहोत. 

महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब आणि निराधार लोकांसाठी विविध योजना राबवत असते. या सर्व योजनांमध्ये संजय गांधी निराधार पेन्शन योजना ही अतिशय लोकप्रिय आणि महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये लाभार्थी व्यक्तीला एक हजार पाचशे रुपयाचे आर्थिक सहाय्य केले जाते. तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमच्या गावातील तलाठी कार्यालयाला भेट द्या योजनेची सविस्तर माहिती त्यांच्याकडून घ्या. या योजनेची सर्वसामान्य लोकांना माहिती देणे आणि त्यांना आवश्यक ती मदत देणे याची जवाबदारी तलाठी यांची आहे. 


या योजनेसाठी कोण पात्र आहे

संजय गांधी निराधार पेन्शन योजना अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला लाभ घेऊ शकतात. या योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अंत अपंग अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती, घटस्फोटीत महिला, वैशाली व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला यांना आर्थिक सहाय्य केले जाते. 

  • अपंग व्यक्ती
  • मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती
  • अनाथ मुले 
  • निराधार महिला, निराधार विधवा, शेतमजूर महिला.
  • आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी
  • घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या महिला.
  • अत्याचारीत महिला
  • वैशा व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला
  • देवदासी
  • पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री 

आपल्या समाजामध्ये जवळपास अशा पात्र व्यक्ती असतील तर हे माहिती त्यांच्या पर्यंत पोहचावा आणि त्यांना चौकशी साठी तलाठी कार्यालयास भेट द्यायला सांगा. कारण अजूनही अनेक लोकांना या योजनेची पूर्ण माहिती नाही. या योजनेचा अर्ज सेतू केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा तहसीलदारकार्यालयात अर्ज करता येतो. 



अर्ज PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा




Post a Comment

Previous Post Next Post
Majhi Yojana | All Information about Maharashtra Government Schemes