राज्य कृषी यांत्रीकरण योजना 50 टक्के अनुदान वाचा सविस्तर माहिती

 


राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना - शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत त्यामध्ये राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश कृषी यांत्रिकरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त कृषी यंत्राचा वापर करून शेती सुलभ करावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकरणाचा लाभ मिळावा हा कृषी यांत्रिकरण योजनेचा उद्देश आहे. कृषी यांत्रिकरण योजनेमध्ये सर्व प्रकारच्या कृषी यंत्र आणि अवजारांचा समावेश होतो. या योजनेमध्ये कृषी यंत्र आणि अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, मनुष्यचलित यंत्र आणि अवजारे, प्रक्रिया संच अशा प्रकारच्या सर्व कृषी यंत्र आणि अवजारांच्या खरेदीसाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य दिले जाते. 


योजनेसाठी कागदपत्रे

1. आधार कार्ड 

2. 7/12 उतारा 

3. 8 अ उतारा.

4. खरेदी करावयाच्या अवजाराची कोटेशन आणि केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल. 

5. जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी)

6. पूर्व संमती पत्र 

7. स्वयंघोषणापत्र 


पात्रता 

शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 

शेतकऱ्यांच्या नावावर शेती असली पाहिजे. म्हणजेच शेतकऱ्याकडे सातबारा उतारा आणि खाते उतारा असला पाहिजे. 


अनुदान 

1. ट्रॅक्टर 

2. पावर टिलर 

3. ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे 

5. मनुष्य चलित यंत्र / अवजारे 

6. प्रक्रिया संच 

7. काढणीपश्चात तंत्रज्ञान 

8. फलोत्पादन यंत्र किंवा अवजारे 

9 वैशिष्ट्यपूर्ण यंत्र आवजारे 

10. स्वयं चलित यंत्रे 



👇👇👇

कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा


Post a Comment

Previous Post Next Post