Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही योजना महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने सुरु केली आहे. या योजनेमध्ये गरजू महिला ज्यांच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे. अशा वय वर्ष २१ ते ६५ वर्ष या दरम्यान वय असलेल्या महिलांना प्रती माह 1500/- रुपये दिले जातात. या योजेनेचे अर्ज महिलांकडून भरून घेत असताना सरकारने योजनेसाठी असलेल्या नियम अटी मान्य असलेबाबत स्वयंघोषणापत्र लिहून घेतले होते. तरीही काही महिलांनी नियम व अटी यांचे पालन न करता अर्ज केले होते. व खोटी माहिती सदर केली असल्याने त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आता अशा महिलांचे लाडकी बहिण योजनेचे हप्ते बंद होऊ शकतात परतू शासना कडून कोणतीही पडताळणी किंवा छाननी होणार नाही. असे सांगण्यात येत आहे.
जुन्या अर्जांची छाननी होणार नाही
लाडके बहीण योजनेमध्ये दोन कोटी 34 लाख महिला लाभरते आहेत त्या लाभार्थ्यांची कोणतेही प्रकारची छाननी होणार नाही छाननी बाबत चुकीचे वृत्तसमोर येत आहे या योजनेचे जिल्हा भारतीय आहेत त्यांना योग्य पद्धतीने लाभ मिळालेला आहे. त्या योजनेच्या काळी लाभार्थी महिलांच्या अर्जाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत या तक्रारीबाबत संबंधित विभाग निर्णय घेईल पण सध्यातरी अर्जाची छाननी बाबत कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणी योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता पुढील काही दिवसांमध्ये जमा होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांना वितरित करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
👇👇👇