अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करा - राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान योजना

 


नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासनामार्फत मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ  यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी मधुमक्षिका पालन व्यवसायातून आर्थिक प्रगती साधावी हा शासनाचा उद्देश आहे. यासाठी शासकीय अनेक योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन व्यवसायासाठी अनुदान दिले जाते. मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाला व्हावी या दृष्टीने शासनाने आता मधु क्रांतीचे पोर्टल तयार केले आहे यावर मधु मक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे शासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. 

शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी मधुमक्षिका पालन व्यवसाय हा खूप चांगला पर्याय असू शकतो. यासाठी शासनामार्फत शेतकऱ्यांना अनेक शासकीय योजना दिल्या जात आहेत. शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालन व्यवसायातून आर्थिक प्रगती साधता येते. शासनाला शेतकऱ्यांना व्यवसाय उभा करण्यासाठी मदत करता यावी तसेच शासनाला मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती व्हावी यासाठी मधु क्रांती हे पोर्टल बनवण्यात आले आहे. 

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते पुणे येथील महाराष्ट्र राज्य फुलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना मधुमक्षिका पालन व मध अभियान राबवणारे राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रण म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.


मधु क्रांती पोर्टलवर नोंदणी केल्याचे फायदे 

1. शेतकऱ्यांनी मधु क्रांती पोर्टलवर नोंदणी केल्यास मधुमक्षिका पालकाला नोंदणीकृत किंवा मान्यताप्राप्त मधुमक्षिका पालक म्हणून ओळख मिळणार आहे. 

2. नोंदणी धारकांना एक लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे. 

3. मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर विना अडथळा करता येणार आहे. 

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे -

आधार कार्ड 

मोबाईल नंबर 

मधुमक्षिका पालनास संबंधित तपशील 

मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी 

मधुमक्षिका पालकाचा मधुमक्षिका पेट्या समवेत फोटो 


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 


Post a Comment

Previous Post Next Post