LIC ची विमा सखी योजना, महिलांना दरमहा 7 हजार रुपये मिळणार, असा करा ऑनलाईन अर्ज

 


केंद्र शासनाने महिलांसाठी एक नवीन योजना आणली आहे या योजनेचे नाव विमा सखी योजना असे आहे. ही योजना भारत सरकारच्या एलआयसी कंपनीकडून चालवली जाणार आहे. त्या योजनेमध्ये महिलांना दरमहा सात हजार रुपये मिळणार आहेत. एलआयसी ची विमा सखी योजना स्टीफॅन्डरी योजना आहे. या योजनेचा कालावधी तीन वर्ष आहे. या योजनेसाठी महिलेचे वय 18 वर्षे पूर्ण असावे तसेच कमाल 70 वर्षापर्यंत च्या महिला अर्ज करू शकतात. किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे. 


प्रथम वर्ष दरमहा सात हजार रुपये वेतन

द्वितीय वर्ष दरमहा सहा हजार रुपये वेतन 

तृतीय वर्ष दरमहा पाच हजार रुपये वेतन 


या योजनेमध्ये महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामध्ये महिलांना पगारही दिला जाणार आहे तीन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. तसेच पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या महिलांना एलआयसी कंपनीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर काम करण्याची संधीही मिळणार आहे. 


योजनेसाठी आवश्यक पात्रता 

महिला दहावी उत्तीर्ण असावी 

महिलेचे वय 18 ते 70 वर्षे या दरम्यान असावे

एलआयसी ची विमा सखी ही योजना महिलांना प्रशिक्षण देणारी योजना आहे या योजनेमध्ये त्यांना दरमहा शिष्यवृत्ती मिळणार आहे. या योजनेमध्ये तीन वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पहिल्या वर्षी दरमहा सात हजार रुपये शिष्यवृत्ती, दुसऱ्या वर्षी दरमहा सहा हजार रुपये, आणि तिसऱ्या वर्षी दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड, 

वयाचा पुरावा, 

पत्त्याचा पुरावा 

दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र 


अर्ज कसा करावा ? 

विमा सखी योजनेचे अर्ज एलआयसी च्या अधिकृत वेबसाईटवर करता येणार आहेत. योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत. तुम्ही जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.


👇👇👇

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी माहिती 



Post a Comment

Previous Post Next Post