महाराष्ट्र शासन कृषी विभाग योजना - महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून महा डीबीटी पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात जसे राज्य कृषी यंत्रीकरण योजना, कृषी सिंचन योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, अशा अनेक योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 50 टक्के ते 90 टक्के अनुदान मिळते.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाची महाडीबीटी योजना ऑनलाइन फॉर्म भरणे सुरू आहे
महाडीबीटी फार्मर योजना शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व शासकीय योजनांसाठी आता एकाच वेबसाईटवरून अर्ज करता येणार आहेत. महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून कृषी विभागाकडून राबवले जाणाऱ्या योजनांसाठी अर्ज करता येतो. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात जसे की ट्रॅक्टर खरेदी योजना, पॉवर टिलर पॉवर विडर, ट्रॅक्टर चलीत सर्व प्रकारची अवजारे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, इलेक्ट्रिक मोटर डिझेल इंजन, पाईपलाईन, शेत तळे, कडबा कुट्टी, पाचट कुट्टी, फळबाग लागवड योजना, डाळ मिल, ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र, धान्य व बियाणे प्रक्रिया यंत्रे, अशा प्रकारच्या अनेक कृषी यंत्र व अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळते. शासनाने आणलेल्या डिजिटल इंडिया अंतर्गत आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही शासकीय कार्यालय मध्ये फेरा माराव्या लागत नाहीत. योजनेची अंमलबजावणी संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने होत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टल बनवले आहे. या पोर्टल वर अर्ज करून तुम्ही अनेक योजनांचा लाभ घेऊ शकता.
महाडीबीटी पोर्टल फार्मर लोगिन यावर शेतकऱ्यांसाठी सर्व योजना आहेत. यासाठी आता नवीन वेबसाईट सुरू झाले आहे.https://mahadbt.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाईट आहे.
महाडीबीटी पोर्टल फार्मर (Maha Dbt Farmer)
महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी ही अधिकृत वेबसाईट आणली आहे. या वेबसाईटवर शेतकऱ्यांसाठी सर्व शासकीय योजना असतात. शेतकरी एकाच वेळी अनेक योजनांसाठी ही अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना असणाऱ्या विविध योजनांमध्ये शेतकऱ्यांना कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आणि फळ लागवड योजना अशा विविध योजना नेहमी सुरू असतात. शेतकरी एकाच वेळी अनेक योजनांसाठी अर्ज करू शकतो. शेतकऱ्यांना अर्ज करताना ऑनलाईन अर्ज फी फक्त 23 रुपये 60 पैसे भरावी लागते. शेतकरी योजनांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाते. ज्या शेतकऱ्यांची निवड योजनेसाठी होते त्या शेतकऱ्याने पुढील कार्यवाहीसाठी कागदपत्रे अपलोड करावे लागतात. यानंतर शेतकऱ्यांना कृषी यंत्र आणि साहित्याच्या खरेदीसाठी पूर्वसंमती येते यानंतर शेतकऱ्यांनी खरेदी केल्यानंतर बिले अपलोड करावे लागतात आणि मग नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट वर्ग केली जाते.
❇️ _योजना अनेक अर्ज एक_ ❇️
1) ट्रॅक्टर 4WD/2 WD
2) पॉवर टिलर, पॉवर विडर
3) ट्रॅक्टर चलीत सर्व प्रकारची औजारे व यंत्रे
4) ठिबक सिंचन, तुषार सिंचन ( मीनी/मायक्रो स्प्रींकलर)
5) इ.मोटार/ डिजल इंजिन
6) पाईप लाईन
7) शेततळे 8) शेततळे अस्तरीकरण
9) औजारे बँक 10) कांदा चाळ
11)कडबा कुट्टी, पाचट कुटटी
12) स्प्रेपपं13) पॅक हाउस
14) कोल्ड स्टोरेज
15) फळबाग लागवड ड्रॅगन फ्रुट इ.
16)डाल मिल
18) ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र (ब्लोअर)
19) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
20) विविध पिक कापणी यंत्रे ( हावेस्टर / रिपर )
2 1) धान्य व बियाणे प्रक्रिया यंत्रे
22) पल्व्ह रायझर इ. अनेक शेती औजारे यंत्रे शेतिमाल प्रक्रिया मशिनरी
शेततळे ,इ. मोटार/ डिजल इंजिन,पाईप लाईन , ठिबक सिंचन तुषार सिंचन,भाजीपाला लागवड किट इ.
✳️ आवश्यक कागदपत्रे
1) ८अ व ७/१२ उतारा
2) आधार कार्ड
3) बँक पासबुक
4) औजारा साठी ट्रॅक्टर RC बुक इ.
महा डिबीटी पोर्टल वर ऑनलाइन फॉर्म भरुन विविध योजनांचा लाभ घ्यावा 🙏🏻
अर्ज भरण्याची सुविधा CSC सेंटर व महा इ सेवा केंद्र,आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध
अधिक माहिती साठी संपर्क
कृषी विभाग योजना अर्ज करण्यासाठी आपले गावात कार्यरत कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडल कृषि अधिकारी, यांचेशी संपर्क साधावा.
*महाराष्ट्र शासन कृषि विभाग *