जेष्ठ नागरिकांसाठी शासना मार्फत अनेक योजना राबवल्या जातात त्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना एक महत्वाची योजना आर्थिक दृष्ट्या मागास असणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी राबवली जाते. दारिद्र्य रेषेखालील ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिक या योजनेस पात्र आहेत.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना (Indira Gandhi Pension Yojana)
सरकार समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आर्थिक साह्य करण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवते. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना एक महत्त्वाची योजना आहे या योजनेमध्ये 65 वर्षांवरील दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा पंधराशे रुपये पेन्शन दिली जाते. समाजातील अनेक गरीब लोकांना जे वृद्ध लोक उदरनिर्वाहासाठी काम करू शकत नाहीत अशा लोकांसाठी इंदिरा गांधी पेन्शन योजना महत्त्वाचे आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेसाठी लाभार्थी 65 वर्षावरील निराधार वृद्ध असणं गरजेचं असतं. या योजनेचा उद्देश आर्थिक दृष्ट्या दुर्बल जेष्ठ नागरिकांना दरमहा पेन्शन द्वारा आर्थिक मदत करणे हा आहे. तसेच राज्यातील वृद्ध लोक जे काम करू शकत नाहीत त्यांना सरकारकडून दर महिन्याला आर्थिक मदत देणे काही महत्त्वाचा आहे उद्देश या योजनेमागे आहे.
आवश्यक कागदपत्रे
1. विहित नमुन्यातील अर्ज
2. वयाचा दाखला किमान 65 वर्ष
3. रहिवासी दाखला
4. आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक झेरॉक्स
5. दारिद्र्य रेषेचा दाखला
योजनेचा लाभ
अर्ज मंजूर झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना पंधराशे रुपये पेन्शन मिळते.
योजनेचा अर्ज कोठे करावा
तुमच्या गावातील तलाठी कार्यालयामध्ये या योजनेची चौकशी करावी तसेच या योजनेचा अर्ज तहसीलदार कार्यालय किंवा सेतू केंद्र येथे जाऊन करावा. योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही तलाठी यांचे मार्गदर्शन घेऊ शकता. समाजातील निराधार वयोवृद्ध लोक जे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी काम करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी इंदिरा गांधी पेन्शन योजना महत्त्वाचे आहे. आपल्या जवळपास असे आजी-आजोबा राहत असतील. तर त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण त्यांना मदत केली पाहिजे.