ई पीक पाहणी करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे, जाणून घ्या ई पीक पाहणी कशी करावी ?

 Satara शेतकरी मित्रांनो एक डिसेंबर पासून रब्बी हंगामाची शेतीची ई पीक पाहणी करणे सुरू झालेले आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना रब्बी पिकाची ई पीक पाहणी करण्यास आवाहन करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये आपण शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी कशी करावी याची माहिती घेणार आहोत. शेतीमध्ये नैसर्गिक कारणामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी शेतकरी पिक विमा भरतो. पिक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची इ पीक पाहणी झालेली असली पाहिजे. ई पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्यांनी शेतामध्ये लावलेल्या पिकाची ऑनलाईन नोंदणी करणे होय. पुढील स्टेप्स नुसार तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी करून घेऊ शकता. यासाठी शेतकऱ्यांजवळ अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे.


शेतकऱ्याला सर्वात प्रथम मोबाईल मध्ये गुगल प्ले स्टोअर वर जाऊन e pik pahani ई पीक पाहणी ॲप इन्स्टॉल करून घ्यावे लागणार आहे. 



2. ॲप इन्स्टॉल झाल्यावर तो ओपन करायचा आहे. 



3. आता तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील फोटो आणि मीडिया यांच्या access साठी परमिशन मागील त्यासाठी allow वर क्लिक करायचे आहे. 



4. आता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या लोकेशन साठी परमिशन द्यावी लागेल यासाठी while using this app यावर क्लिक करावे. 


5. आता तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ साठी परमिशन द्यावी लागणार आहे यासाठी while using this app वर क्लिक करावे. 



6. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे. 




तुमच्या विभागाची निवड केल्यावर right allow वर क्लिक करावे. 



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला लॉगिन पद्धत निवडायचे आहे त्यासाठी तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करावे लागणार आहे. 



आता तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकून पुढे जा बटनावर क्लिक करायचे आहे.



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्या पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि गावाची निवड करायची आहे व right allow वर क्लिक करायचे आहे. 



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचे खाते शोधायचे आहे तुम्ही तुमचे पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक गट क्रमांक टाकून खाते शोधू शकता तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार माहिती भरा आणि शोध बटणावर क्लिक करा. 


आता पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव व खाते क्रमांक दिसणार आहे आता तुम्हाला तुमच्या खाते क्रमांक ची निवड करायची आहे व right allow वर क्लिक करायचे आहे 


आता पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक दिसेल तुमचा मोबाईल क्रमांक योग्य असल्याची खात्री करून घ्या व तो योग्य असल्यावर पुढे क्लिक करा 




आता तुम्हाला एक मेसेज दिसेल तुमची नोंदणी आधीच झालेली आहे तुम्हाला पुढे जायचे आहे का तुम्हाला होय वर क्लिक करायचे आहे 



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे आणि तुमचा सांकेतांक टाकायचा आहे 



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पीक माहिती नोंदवा वर क्लिक करायचे आहे 



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकाची विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि पुढे जा वर क्लिक करायचे आहे. 



आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या शेताचे दोन छायाचित्र काढायचे आहेत दोन्ही छायाचित्रे काढून झाल्यावर राईट आला वर allow करायचे आहे. 





आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला तुम्ही भरलेली सर्व माहिती तसेच दोन्ही छायाचित्रे दिसतील सर्व माहिती तपासून पहा व सर्व माहिती अचूक असल्यास मी घोषित करत आहे वर टिक करा आणि पुढे जा वर क्लिक करा 



आता तुम्हाला तुमची माहिती अपलोड झाल्याचा एक मेसेज दिसेल त्यामध्ये ठीक आहे वर क्लिक करा. 


आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला पिकाची माहिती पहा वर क्लिक करून तुम्हाला तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती पाहायची आहे.


पीक पाहणी विषयी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 




Post a Comment

Previous Post Next Post