भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना 100% अनुदान वाचा संपूर्ण माहिती

 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही योजना राज्य सरकार मार्फत नव्याने सुरू करण्यात आले आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासकीय अनुदान दिले जाते. ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवली जात आहे. या योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्यावर्षी 50% अनुदान, दुसऱ्या वर्षी 30% अनुदान आणि तिसर्या वर्षी 20% अनुदान असे शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळते. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी कमीत कमी 20 गुंठे क्षेत्र  असावे. कोकण भागामध्ये शेतकऱ्यांकडे कमीत कमी 10 गुंठे क्षेत्र असावे. अल्प भूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी, आणि महिला शेतकरी यांना या योजनेमध्ये प्राधान्य आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संचाच्या उभारणी करता 100% अनुदान देण्यात येते. तसेच या योजनेमध्ये मिळणाऱ्या अनुदानाची माहिती खालील प्रमाणे आहे. 



पात्रता 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच बसवणे अनिवार्य आहे. ठिबक सिंचन बसवण्यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते. 

या योजनेसाठी सर्व प्रवर्गातील शेतकरी अर्ज करू शकतात. 

शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा असणे आवश्यक आहे. शेतीची संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिस्स्याच्या मर्यादित लाभ घेता येणार आहे. 

आवश्यक कागदपत्रे 

सातबारा व आठ अ उतारा 

हमीपत्र 

संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमती पत्र 

अर्जदार  अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील शेतकरी असल्यास जातीचा दाखला आवश्यक 

शेतकऱ्भायांना ऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा अर्ज Mahadbt Farmer पोर्टल वर अर्ज करता येत आहे.

👇👇👇

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. 



Post a Comment

Previous Post Next Post