बांधकाम कामगार कल्याणकारी योजना

बांधकाम कामगार कल्याणकारी योजना

बांधकाम कामगारांना 26 पेक्षा जास्त कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये आर्थिक योजना, सामाजिक योजना,  शैक्षणिक योजना आणि आरोग्य योजना या योजनांचा समावेश आहे. शैक्षणिक योजनेमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पत्नी व मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. इयत्ता पहिली ते उच्च शिक्षण पर्यंत प्रत्येक वर्षी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच आरोग्य योजनांमध्ये बांधकाम कामगारांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन लाख रुपये पर्यंत संपूर्ण मोफत उपचार दिला जातो. यामध्ये सर्व आजारांवर पूर्णपणे मोफत उपचार केला जातो. सामाजिक योजना मध्ये बांधकाम कामगाराला घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिल जाते. बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नाला 50 हजार रुपये अनुदान दिले जाते. तसेच बांधकाम कामगार  स्वतःच्या लग्नासाठी तीस हजार रुपये अनुदान मिळवू शकतो. तसेच बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच आणि पेटी वाटप केली जाते. 


योजनांच्या सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post