बांधकाम कामगार नवीन नोंदणी अर्ज कसा करावा जाणून घ्या संपूर्ण माहिती

बांधकाम कामगार नवीन अर्ज | बांधकाम कामगार - तालुका कामगार सुविधा केंद्र

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अनेक योजनांचा लाभ दिला जातो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड मिळते. याचा उपयोग करून बांधकाम कामगार अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात. या पोस्टमध्ये आपण बांधकाम कामगार नोंदणी नवीन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. 


बांधकाम कामगार नोंदणी साठी पात्रता 

तुम्ही बांधकाम क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीत्या काम करत असली पाहिजे. 

  वय 18 ते 60 वर्ष या दरम्यान असले पाहिजे. 

तुम्ही 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम क्षेत्रात काम केले असले पाहिजे. 

तुमच्याजवळ आधार कार्ड असले पाहिजे. 


आवश्यक कागदपत्र 

1. 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम क्षेत्रात काम करत असले बाबत ठेकेदार किंवा ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र 

2. आधार कार्ड 


बांधकाम कामगार नोंदणीसाठी अर्ज कसा करावा? 

नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज ऑनलाईन सादर करण्यासाठी बांधकाम कामगारांनी जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन सर्व कागदपत्रासहित ऑनलाइन अर्ज करावा. यासाठी बांधकाम कामगाराकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही.


👇👇👇

तुमच्या जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रचा पत्ता

Post a Comment

Previous Post Next Post