अतिवृष्टी नुकसान भरपाई 2024, हे जिल्हे पात्र, शासन निर्णय पहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी किंवा पूर यामुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत दिली जात आहे. 

 जून ते आक्टोंबर 2024 या कालावधीमध्ये आपल्या राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी किंवा पूर यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले आहे. अशा शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 292057.50 (दोन हजार नऊशे कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार हजार फक्त) रुपये इतका निधी वितरित करण्याची शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. 


👇👇👇

शासन निर्णय पहा 


मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टी किंवा पूर यांच्यामुळे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी वरील शासन निर्णय महत्वाचा आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी त्यांच्या गावातील तलाठी कार्यालय मध्ये जाऊन यादी मध्ये नाव असलेबाबत खात्री करून घ्यायची आहे. त्यांनी आधार केवयासी करून घ्यावी लागणार आहे. यामुळे सर्वप्रथम वरील शासन निर्णय पूर्ण वाचून घेणे आणि तलाठी कार्यालयात चौकशी करणे महत्वाचे आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post