विश्वकर्मा योजना
विश्वकर्मा योजनेतून 15000 रुपयांचे टूलकिट तसेच एक लाख रुपयांची कर्ज आणि व्यवसायाची ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र मिळणार आहे विश्वकर्मा योजना परंपरेने चालत आलेल्या व्यवसायांसाठी आहे जसे की कुंभार, लोहार, सुतार, सोनार, गवंडी, न्हावी, धोबी, शिंपी अशा प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या योजना आहे. विश्वकर्मा योजना या योजनेचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू आहे.
विश्वकर्मा योजना पारंपारिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने सुरू केले आहे या योजनेमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी ट्रेनिंग व्यवसायाचे टूलकीट आणि कर्ज दिले जात आहे. ज्या लोकांनी या योजनेमध्ये अर्ज केले आहेत त्या लोकांना ट्रेनिंग देण्यासाठी बोलवले जात आहे. पाच दिवसाचे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या लोकांना प्रमाणपत्र आणि आयडेंटी दिले जात आहे.
विश्वकर्मा योजनेमध्ये तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन अर्ज करून घ्या अर्ज केल्यानंतर तो अर्ज मंजुरीसाठी जवळच्या ग्रामपंचायतीमध्ये जातो ग्रामपंचायतीमधील सरपंच या अर्जाला मंजुरी देतो अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला शासनाकडून ट्रेनिंग घेण्यासाठी बोलत जाते. ट्रेनिंग पाच दिवसाच्या आहे तसेच तुम्हाला यापेक्षा जास्त ऍडव्हान्स ट्रेनिंग पाहिजे असेल तर तुम्ही पंधरा दिवसाची ट्रेनिंग ही मागू शकता. ट्रेनिंग घेताना प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये दिले जातात. म्हणजेच तुम्ही पाच दिवसाची ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पाच दिवसाचे अडीच हजार रुपये दिले जातात.
विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.