प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम Pradhanmantri Pik Vima Yojana
नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम साठी शासनाकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व शेतकरी बंधूंनी पेरणी केलेल्या पिकाची भविष्यात नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी पिक विमा भरणे आवश्यक आहे. पिक विमा भरण्यासाठी शासनाला फक्त एक रुपया शेतकऱ्यांना द्यावा लागत आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रामध्ये किंवा ऑनलाईन स्वतःही पिक विमा भरू शकता.
प्रधानमंत्री पिक विमा योजना - शेती व्यवसाय हा संपूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. निसर्गाच्या अनियमिततेमुळे कधी अतिवृष्टी कधी दुष्काळ अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांचे जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्यातून सावरता यावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये पिक विमा रक्कम फक्त एक रुपया शासनाकडे भरावा लागतो.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम या दोन हंगामातील लागवड केलेल्या पिकांसाठी पिक विमा उतरवला जातो. सध्या रब्बी हंगाम मधे लावलेल्या पिकासाठी जसे की हरभरा, गहू, रब्बी कांदा अशी पिके यामध्ये समाविष्ट असतात.
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्याचे आधार कार्ड
शेतकऱ्याचे बँक पासबुक
शेतीचा सातबारा आणि खाते उतारा.