प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना : महिलांना ब्युटी पार्लरचे मोफत प्रशिक्षण
नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेमध्ये समाजातील पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रशिक्षण प्रोत्साहन पर अनुदान आणि कर्ज उपलब्ध करून दिले जाते. विश्वकर्मा योजनेतून सलून व्यवसाय आणि ब्युटी पार्लर व्यवसाय यांना प्रशिक्षण, तसेच कर्ज उपलब्ध करून देणे सुरू आहे.
विश्वकर्मा योजनेतून सलून व्यवसाय आणि ब्युटी पार्लर व्यवसाय याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तुम्हाला जर या व्यवसायांचे प्रशिक्षण पाहिजे असेल तर तुम्ही विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा. विश्वकर्मा योजनेचा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तो ग्रामपंचायतीमध्ये सरपंचांच्या मंजुरीने पुढे जातो. यानंतर अर्ज केलेल्या लोकांचे प्रशिक्षण घेतले जाते. प्रशिक्षण पाच दिवसाच्या असते या पाच दिवसांमध्ये सरकार तुम्हाला प्रत्येक दिवसाला पाचशे रुपये देते तसेच जेवण खाण्याचे तीनशे रुपये असे मिळून प्रत्येक दिवसाला आठशे रुपये आणि पाच दिवसाचे चार हजार रुपये सरकारच देणार आहे. म्हणजेच प्रशिक्षण सुद्धा मोफत आणि प्रशिक्षण घेतल्याबद्दल सरकारच आपल्याला चार हजार रुपये देणार आहे. प्रशिक्षण झाल्यानंतर केंद्र सरकारचे प्रमाणपत्र आणि आयडेंटी मिळते. यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये व्यवसायाचे साहित्य खरेदीसाठी दिले जातात. यातून तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे. तसेच कर्ज आवश्यक असल्यास कर्ज ही बँकेतून त्वरित मंजूर होत आहे. सुरुवातीला एक लाख रुपयाचे कर्ज फक्त पाच टक्के व्याजदराने शासन देणार आहे.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
विश्वकर्मा योजना सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगली योजना आहे या योजनेचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये सर्व पारंपारिक व्यवसायाची प्रशिक्षण दिले जाते जसे की, सुतार, लोहार, कुंभार, सोनार, न्हावी, धोबी, आणि शिंपी. तुम्हाला जर स्वतःचे ब्युटी पार्लर उडायचे असेल तर तुम्ही विश्वकर्मा योजनेतून बार्बर (न्हावी) या कॅटेगरीतून अर्ज करावा. तुम्हाला ब्युटी पार्लर च प्रशिक्षण देण्यात येईल.