पिक विमा रब्बी हंगाम ऑनलाइन अर्ज सुरू, त्वरित अर्ज करा

 प्रधानमंत्री पिक विमा रब्बी हंगाम 2024 



प्रधानमंत्री पिक विमा रब्बी हंगाम ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये हरभरा, गहू, ज्वारी अशी पिके घेतली असतील तर त्यांनी लवकरात लवकर पिकाचा पिक विमा उतरवला पाहिजे. जर पिकाचे नुकसान झाले तर शासन तुम्हाला नुकसान भरपाई देईल यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाचा पिक विमा केलाच पाहिजे.

प्रधानमंत्री पिक विमा रब्बी हंगाम अर्ज कसा करावा ?

प्रधानमंत्री पिक विमा रब्बी हंगाम साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. अर्ज करण्यासाठी https://pmfby.gov.in/ या अधिकृत साइटवर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शेतकरी स्वतः मोबाईल वरूनही ऑनलाइन अर्ज करू शकतात. किंवा जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन ऑनलाइन अर्ज करता येतो. अर्ज करण्यासाठी पुढील कागदपत्रे आवश्यक असतात. 

आवश्यक कागदपत्र


शेतकऱ्याचे आधार कार्ड 
बँक पासबुक 
शेतीचा सातबारा आणि खाते उतारा 
शेतकऱ्याची पीक पेरणी बाबत स्वयंघोषणापत्र 
शेती सामायिक असल्यास सामायिक शेतकऱ्यांची सहमती पत्र 


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील कागदपत्रे आवश्यक असतात. 

ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला फक्त एक रुपये शासकीय फी भरायचे आहे. तुम्ही जर स्वतः मोबाईल वरून भरणार असाल तर फक्त एक रुपयांमध्ये तुमच्या शेतीचा पिक विमा उतरवू शकता. किंवा सीएससी केंद्रामध्ये तुम्ही पिक विमा उतरवल्यास तुम्हाला सीएससी केंद्र चालकाचे सर्विस चार्ज 50 रुपये किंवा शंभर रुपये द्यावे लागतील. पिक विमा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली लिंक दिले आहे त्यावर क्लिक करून तुम्ही थेट अर्ज करू शकता. 

 

Post a Comment

Previous Post Next Post