नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय झालेली योजना आहे. या योजनेमध्ये महिलांना पंधराशे रुपये दरमहा दिले जातात. या योजनेमध्ये आतापर्यंत जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हप्ते वितरित करण्यात आलेले आहेत.
लाडकी बहिणी योजनेमध्ये या महिलांचे हप्ते होणार बंद, जाणूनच्या महत्त्वाची अपडेट
लाडकी बहीण योजनांमध्ये अर्ज करताना काही नियम व अटी दिल्या होत्या. या योजनेमध्ये ज्या महिला इतर सरकारी योजनांचा जसे की संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना अशा योजनांचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही. असे सांगण्यात आले होते. परंतु काही महिलांनी त्यामध्ये दिलेल्या नियम व अटी यांचे पालन न करता अर्ज केलेले आहेत. आणि त्यांना हप्तेही मिळाले आहेत. अशा सर्व महिलांचे लाडके बहीण योजनेच्या हप्ते बंद होऊ शकतात.
लाडकी बहीण योजनेमध्ये दिलेल्या स्वयंघोषणापत्र मध्ये सर्व नियम व अटी आहेत. परंतु शासनाला चुकीची माहिती पुरवून या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना पुढील हप्ते बंद होऊ शकतात. या योजनेमध्ये मिळणारे हप्ते त्यांच्या आधार कार्ड च्या माध्यमातून दिले जात आहेत. आधार कार्ड वरून कोणाला श्रावणबाळ योजना किंवा संजय गांधी योजना सुरू असेल तर लगेच समजू शकते.
विधानसभा निवडणुकीनंतर या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. लाडकी बहीण योजनांमध्ये निवडणुकीनंतर 2100 रुपये दर महा दिले जाणार आहेत.
लाडकी बहिण योजना - अधिकृत वेबसाईटवर जा.