विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज कसा करावा? कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना - Vishwkarma Yojana



नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्र शासनाची अतिशय चांगली योजना आहे. या योजनेमध्ये व्यवसायाची ट्रेनिंग प्रमाणपत्र, आयडेंटी, पंधरा हजार रुपयाची व्यवसायाचे साहित्य, तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेमध्ये पारंपारिक व्यवसाय जसे की कुंभार लोहार सोनार सुतार धोबी शिंपी कोळी झाडू बनवणारे यांचा समावेश होतो. 

आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड 

बँक पासबुक 

पॅन कार्ड 

रेशन कार्ड 


अर्ज कसा करावा 

विश्वकर्मा योजनेचा अर्ज सीएससी सेंटर मध्ये करावा लागतो. 

तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन आधार कार्ड देऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आधार कार्डवर पत्त्यावर वडिलांचे नाव अपडेट करावे लागते. जर लग्न झालेल्या महिला असतील तर पतीचे नाव अपडेट करावे लागते. याशिवाय अर्ज करता येत नाही. अर्ज करण्या अगोदर तुम्ही जवळच्या आधार सेंटर मध्ये जाऊन आधार कार्ड अपडेट करून घ्या. आणि नंतर विश्वकर्मा योजनेचा अर्ज भरा.


विश्वकर्मा योजनेचे फायदे 

विश्वकर्मा योजनेतून व्यवसायाचे ट्रेनिंग मिळते. या ट्रेनिंग मध्ये प्रत्येक दिवशी पाचशे रुपये दिले जातात. 

ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर विश्वकर्मा योजनेचे प्रमाणपत्र आणि आयडेंटी मिळते. 

विश्वकर्मा योजनेतून पंधरा हजार रुपयाची व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक टूल किट म्हणजेच साहित्य मिळते. 

विश्वकर्मा योजनेतून एक लाख रुपयाचे कर्ज फक्त पाच टक्के व्याजदराने मिळते. 



Post a Comment

Previous Post Next Post