बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी झाली बंद, आता असा करावा लागणार अर्ज

 


बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी झाली बंद

बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व बांधकाम कामगारांना शासनाकडून अनेक योजनांचा लाभ मिळतो. योजनांचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे कामगारांची नोंदणी असणे आवश्यक असते. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी अर्ज करता येत होता. परंतु आता एक नवीन बदल करण्यात आला आहे. आता बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी आणि नूतनीकरणासाठी नजीकच्या तालुका सुविधा केंद्रात अर्ज करावा लागणार आहे. 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत वेबसाईटवर एक महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे. नव्याने नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्याकरिता संबंधित बांधकाम कामगारांनी आपल्या मूळ कागदपत्रांसह नजीकच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे. अशी ही सूचना आहे. यावरून आता असे समजत आहे की आता येथून पुढील बांधकाम कामगार चे अर्ज ऑनलाइन करण्यासाठी तालुका स्तरावर असणाऱ्या तालुका कामगार सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. 


बांधकाम कामगार अधिकृत साईट 

Post a Comment

Previous Post Next Post