बांधकाम कामगारांना भांडी व पेटी वाटप कधी सुरू होणार ?



महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगार यांना मोफत भांडी संच व पेटी दिली जाते. आचारसंहिता लागण्या अगोदर अनेक बांधकाम कामगारांना भांडी संच आणि पेटी वाटप झाले आहे. तरी बऱ्याच बांधकाम कामगारांना अजूनही भांडी संच योजनेचा लाभ मिळालेला नाही. अशा बांधकाम कामगारांना भांडी वाटप कधी होईल याची आतुरता लागली आहे. 

बांधकाम कामगारांना भांडी व पेटी वाटप कधी होणार ? 

बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत बांधकाम कामगारांना अनेक योजना राबवल्या जातात. सध्या बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाची अधिकृत वेबसाईट बंद आहे. शासन योजना राबवण्यामध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. आता बांधकाम कामगार तालुका सुविधा केंद्र मध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण, योजनांच्या लाभाच्या अर्ज, तसेच दुरुस्ती या सर्वांसाठी तालुकास्तरावर असणाऱ्या बांधकाम कामगार सुविधा केंद्र मध्ये जाऊन अर्ज करावा लागणार आहे. परंतु अद्यापही तालुका सुविधा केंद्रे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे भांडी वाटप आणि पेटी वाटप या योजनाही लवकर सुरू होतील असे सांगता येत नाही. सत्ता स्थापनेनंतर किमान पंधरा दिवस ते एक महिना एवढा कालावधी भांडी वाटप सुरू होण्यासाठी लागू शकतो. 


शासन बांधकाम कामगारांना अनेक योजना पुरवते परंतु योजना राबवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करण्यामुळे  भांडी वाटप आणि पेटी वटप होण्यास अजून विलंब लागू शकतो. 


अधिकृत वेबसाईट :- https://mahabocw.in

Post a Comment

Previous Post Next Post